👁 4 Views

शिर्डीत साई भक्त अन् सुरक्षा रक्षकामध्ये तुफान हाणामारी

 

शिर्डीमध्ये साई संस्थान परिसरात साई भक्त आणि सुरक्षा रक्षकामध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंदिरात जाण्यापासून रोखल्यानं हा वाद पेटल्याचं सांगितलं जात आहे. या हाणामारीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


शिर्डीतील साई संस्थानमध्ये रामनवमीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. या काळात देशभरातून मोठ्या प्रमाणावर पालख्या शिर्डीत येत असतात.


 त्यानुसार यंदाही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. आज या उत्सवाची सांगता असून या पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत. यातच मुंबईची साईलीला पारखी ही गेट क्रमांक पाचमधून बाहेर पडली होती. 

बाहेर आल्यानंतर या पालखीतील भाविकांचं काहीतरी सामान आतमध्ये राहिलं, त्यामुळं एकानं ते आणण्यासाठी या गेटमधून पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला सुरक्षा रक्षकानं रोखलं, त्यातून वाद निर्माण झाला


यानंतर हा किरकोळ वाद विकोपाला गेला त्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर मंदिर परिसरात काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिर्डीत अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. सुरक्षारक्षकातून वादातून अशा हाणामाऱ्या यापूर्वीही झाल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *