👁 4 Views

पंढरपूर रोटरी क्लब कडून वृद्ध व दिव्यांगासाठी तुळशी वृंदावन पाहणयासाठी व्हीलचेअर भेट

पंढरपूर: प्रतिनिधी

अपंग किंवा वृद्ध व्यक्तींना इतरांची मदत न घेता पंढरपूर येथील तुळशी वृंदावन पाहण्याचे स्वप्न आता पंढरपूर रोटरी क्लब कडून पुर्ण होणार असुन रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांबाबत माहिती दिली आहे.


   गुरुवार दिनांक ३० मार्च २०२३ रोजी पंढरपूर येथील तुळशी वृंदावन आलेल्या वृद्ध व अपंग भाविक भक्तांना तुळशी वृंदावन बागेचा फिरून आनंद घेता यावा यासाठी पंढरपूर रोटरी क्लब कडून व्हीलचेअर तुळशी वृंदावन येथे भेट देण्यात आली.


    हि व्हीलचेअर रो. प्रकाश मेटकर व निकते केमिस्ट यांच्या सौजन्याने वन विभागाला व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात आली. वनरक्षक सचिन कांबळे यांनी पंढरपूर रोटरी क्लबचे आभार मानले. 


   या दरम्यान गार्ड महेश डोंगरे, संदीप घाडगे, रो. किशोर निकते, रोटरी क्लब पंढरपूर सचिव सचिन भिंगे, रो. सोमेश गानमोटे, विष्णुकांत मंत्री व अनेक पर्यटक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *