शिरुर : शेतातून कांदा भरुन घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरुरमधील रांजणगाव सांडस येथे घडली.
ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात
रणदिवे पिता-पुत्र आपल्या शेतातील कांद्याचे पीक काढून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन घरी येते होते. देशमुख वस्ती ते रांजणगाव सांडस न्हावरे रोडकडे येत असताना वाटेत तानाजी भंडलकर यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाला. येथे रस्ता उतार असल्याने ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या उजव्या बाजूला खड्ड्यात पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुण त्याखाली आला आणि गंभीर जखमी झाला. त्याचे वडिलही यात जखमी
झाले.
गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर जखमी तरुणाला तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपाचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूमुळे रणदिवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी न्हावरे पोलीस दूरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. तरुणा मुलाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



