पंढरपूर लाईव्ह- पुणे जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना चे 45 रुग्ण पॉझिटीव्ह आढढळुन आले आहेत. यापैकी 16 जणांना डिस्चार्ज दिला असुन एकाचा काल उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तर 28 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे विभागात सांगलीत 25, कोल्हापूरात 2 तर सातार्यात 2 असे 29 कोरोना बाधीत रुग्ण आहेत. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली आहे.
नागरिकांनी घराबाहेर न पडता नियमांचे पालन करवो. असे आवाहन त्यांनी पुन्हा केले आहे. उद्यापासुन रेशनकार्डावरील धान्याचे वाटप सुरु होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

