👁 7 Views

जिंती येथील ग्रामस्थांची माणुसकी… गडचिरोली येथील कामगारांच्या जेवणाची केली व्यवस्था

ढेबेवाडी: जिंती येथील ग्रामस्थांनी गडचिरोली येथील आपल्या भागात अडकलेल्या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करुन माणुसकीचे दर्शन घडविले. 

रोजीरोटीसाठी गडचिरोली वरून 40 मजुर पाटण तालुक्यातील जिंती येथे रोड चे  बांधकाम करण्यासाठी आले होते. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर त्यांना आपल्या गावाकडे जाता न आल्याने ते येथेचअडकुन पडले आहेत. 

जगभरात कोरोना या रोगाने धुमाकुळ घातला असून आता देश लॉकडाउन झाला आहे. या परिस्थितीत जिंती ग्रामस्थाच्या  वतीने त्यांना जीवनावश्यक वस्तू गहू,तांदूळ,ज्वारी, तेल, , बिस्कीट  देण्यात आले. यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *