👁 6 Views

लॉकडाऊन कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या 31 मोटारसायकली मेढा पोलिसांच्या ताब्यात

केळघर : वार्ताहर – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन वारंवार करत आहेत . तरीही काहीजण विनाकारण फिरत आहेत . अशा विनाकारण वाहने फिरवणार्‍यांवर मेढा पोलीसांनी कडक कारवाई करत 31 मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत.
              आजपासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून मेढयाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आधिकारी व कर्मचारी यांनी बाजारपेठेतून विनाकारण फिरणाच्या 31 वाहने ताब्यात घेतली असून या वाहन चालकांवर योग्य ती कारवाई  करण्यात येत असून कोणीही विनाकारण फिरू नये असे आवाहन पोलीसाकडून करण्यात येत आहे .
फोटो – मेढा पोलीस स्टेशनच्या आवारात कारवाई करून लावण्यात आलेली वाहने

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *