👁 8 Views

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांने बनवले स्वयंचलित निर्जंतुकीकरण शॉवर यंञ

कोरोना संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी स्वयंचलित निर्जंतुकीकरण शॉवर तयार करून ते मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे  बसविण्यात आला आहे. 

○ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव 

रोखण्यासाठी शाॅवरचा  होतोय उपयोग

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी सुरज डोके यांनी


कोरोनाला अटकाव करण्यासाठी स्वयंचलित निर्जंतुकीकरण शॉवर

तयार केले आहे.

कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याच अनुषंगाने पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेल्या सुरज डोके यांनी कोरोना संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी स्वयंचलित निर्जंतुकीकरण शॉवर तयार करून ते मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे  बसविण्यात आला आहे. पोलिस स्टेशनमध्ये येणार्‍या प्रत्येक नागरिक  व पोलिस कर्मचार्‍यांवर या यंञाच्या साह्याने स्प्रे होत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चांगली मदत होत आहे.

कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र धुमाकुळ घातल्याने प्रत्येकजण हतबल होत आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे प्रयत्नही केले जात आहेत. पंढरपूर सिंहगडच्या माजी विद्यार्थ्यांने आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर स्वयंचलित निर्जंतुकीकरण शॉवर यंञ तयार करून ते मंगळवेढा पोलिस स्टेशनच्या गेटवर बसविण्यात आले आहे. नागरिकांचा पाऊल या कक्षात पडताच स्वयंचलित पध्दतीने शॉवर आपोआप चालू होवून नागरिकांच्या अंगावर फवारा उडत असल्याने संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरण होत आहे. बाहेर जातानाही याच पध्दतीचा अवलंब होत असल्याने कोरोना संसर्गजन्य आजाराला अटकाव होण्यास मदत झाली आहे.

मंगळवेढयात पहिलाच हा प्रयोग राबविण्यात आला आहे.

स्वयंचलित पध्दतीने शॉवर यंञ तयार केलेल्या सुरज डोके यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अतुल आराध्ये, प्रा. महेश कुलकर्णी आदी सह महाविद्यालयातील अनेक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *