👁 8 Views

Video- पुणे विभागात आज 5 वाजेपर्यंत एकुण 472 कोवीडचे रुग्ण; पैकी आजतागायत 42 रुग्णांचा मृत्यु – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

Pandharpur Live-  पुणे विभागात आज 15 एप्रिल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रिपोर्टनुसार 472 कोवीडचे रुग्ण आढळुन आले आहेत. पैकी पुणे विभागातील 42 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिलीय.

पुणे जिल्हा एकुण 53 नवीन रुग्ण आढळुन आले आहेत. पुणे जिल्हा एकुण रुग्ण संख्या 427 झाली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 363 रुग्ण ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात  42 रुग्ण, 22 रुग्ण कॅन्टोन्मेंट आणि ग्रामीण भागात आढळुन आले आहेत. 

पुणे शहरातील 42 रुग्णांना आजपर्यंत डिस्चार्ज दिला आहे. तर आजतागायत 39 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आज दिवसभरात एकंदर 3 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. पैकी 2 जेष्ठ नागरिक व 1 कमी वयाचा रुग्ण होता. 

पुणे विभागातील आज सातारा रुग्णसंख्या  नवीन 4 एकुण 8 आहेत. पैकी 2 चा मृत्यु झालाय, सोलापूरात दोन आढळले होते पैकी 1 रुग्ण मृत,   सांगली 26 आढळुन आले पैकी 25 जणांना डिस्चार्ज दिलाय, कोल्हापूर मध्ये 6 रुग्ण आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिलीय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *