👁 17 Views

बेजबाबदार वागू नका, स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका…”कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे” हा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवूया -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

 
            मुंबईदि. 21 :- ‘कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावंयापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचं पालन करावंनागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नयेघराबाहेर पडू नयेगर्दीत जाऊन स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नयेअसं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
            मुंबईठाणेपुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातमालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यानं चिंता वाढली आहे. मुंबईत कालच्या एका दिवसात साडेचारशेहून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील रुग्णांची संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. 24 मार्चच्या आधीपासून टाळेबंदी जाहीर करुनही झालेली वाढ गंभीर आहे. मुंबईतील 53 पत्रकार बांधवांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहेयातून कोरोनानं हातपाय कुठपर्यंत पसरले आहेत हे लक्षात येतं. तरीही शहरात रस्त्यांवरगल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. यातून ते स्वत:च्याकुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत, हे थांबलं पाहिजे. घरातली व्यक्ती घराबाहेर जाणार नाही ही जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनीमुलांनी घेतली पाहिजे. घराबाहेर जाण्यापासून सर्वांना रोखलं पाहिजेअसं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी  केलं आहे.
            देशाचे पंतप्रधानराज्याचे मुख्यमंत्रीआरोग्यमंत्रीआपले डॉक्टरआपले पोलिसया सर्वांनी आपल्याला घराबाहेर न पडण्याचंघरातच थांबण्याचंगर्दी न करण्याचंसुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनानुसार आम्ही देखील सामाजिक अंतराचं भान राखूनसुरक्षितता बाळगून कर्तव्ये पार पाडत आहोत. किमान अधिकारी व सहकाऱ्यांना सोबत घेऊनबैठका घेऊन विषय मार्गी लावत आहोत. केंद्र व राज्य सरकारंसर्व लोकप्रतिनिधीप्रशासकीय अधिकारीशासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील प्रत्येक जण जोखीम पत्करुन आज कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांनी घरातच थांबून साथ द्यावीही त्यांची अपेक्षा आहे. नागरिकांनी दाखवलेला संयमसहकार्यामुळेच राज्यातील काही जिल्हे आजही कोरोनामुक्त आहेत. नांदेडसांगलीसारखे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापासून बोध घेऊन आपला जिल्हाही कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातंच थांबण्याचा निर्धार केल्यास कोरोनाच्या लढाईत विजय नक्की आहेअसा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईठाणेपुण्यातमालेगाव सारख्या शहरात पुढचे काही दिवस टाळेबंदी नियमांचं मनापासूनस्वयंशिस्तीनं काटेकोर पालन करावंअसं आवाहन त्यांनी केलं आहे.
            कोरोनाविरुद्धच्या लढाईत जात-पातभाषा-प्रांतधर्म-पंथ विसरुन एकजूट होऊन साथ देण्याची गरज आहे. कोरोनाचा लढा हा मानवतेच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. तो संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद-विसंवाद टाळला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारीनिषेधार्ह असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रकरणाची सीआयडी चौकशी  सुरु झाली असून शंभरहून अधिक आरोपींना अटक केली आहे. सर्व दोषींना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा नक्की होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *