👁 12 Views

Video- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर डिव्हीपी उद्योग समूहाचं आणखी एक अनमोल सद्कार्य… मुख्यमंत्री सहायत्ता निधीस दिली 1 लाख रुपयांची आर्थिक मदत

Pandharpur Live- कोव्हीड 19 विषाणुजन्य व्हायरसच्या प्रसारांमुळे संपुर्ण जग भयग्रस्त झाले असून भारतामध्ये त्याची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याने याच पार्श्‍वभुमीवर डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आरोग्यसेवक, पोलीस, पत्रकार यांच्यासाठी दररोज मोफत नाष्टा व जेवणाची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यानंतर त्यांनी आणखी एक अनमोल सद्कार्य केलेलं आहे. ते म्हणजे आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी त्यांनी 1 लाख रुपयांची मदत दिलीय. याचा धनादेश त्यांनी नुकताच पंढरपूर चे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, ही मदत नसून माझं कर्तव्य आहे, माझा वाटा मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये देताना आपणा सर्वांना आवाहन करतो की, महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी आपणही फुल ना फुलाची पाकळी मुख्यमंत्री सहायत्ता निधीस द्यावी, आपण घरातच राहून प्रशासनाकडून येणार्‍या सुचनेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, घरातच राहून आपण व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *