आपल्या कृतीतुन परमार्थ साधण्याचं काम सध्याच्या लॉकडाऊन काळात साठे बंधू करत आहेत, कोरोना विषाणुचं हे युध्द मानवानंच मानवाच्या विरुध्द सुरु केलंय परंतु मानवानंच मानवाची सेवा केली तर या युध्दात आपण नक्कीच विजयी होऊ असे मत ह.भ.प. तनपुरे महाराज यांनी व्यक्त केलंय.
सध्या लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थांना शिवभाजीपाला केंद्राच्या माध्यमातुन शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे हे मोफत भाजीपाला पुरवठा करत आहेत. या ठिकाणी तनपुरे महाराज यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
लक्ष्मी टाकळी येथील साठे बंधुंच्या शिव भाजीपाला वाटप केंद्राद्वारे दररोज 5 हजार किलो भाजीपाला घरपोहोच देण्याची सेवा पांडुरंगाच्या चरणी रुजु झाली आहे. देव सर्वत्र आहे हे याद्वारे दिसुन आले. ‘‘जे का रंजले गंाजले त्यासी म्हणे जो आपुले’’ या संत वचनाप्रमाणे साठे बंधुंनी जनसेवेचा घेतलेला हा वसा निश्चितच कौतुकास्पद आहे. ज्याला गरज आहे त्याच्या घरी जावुन त्याची गरज पुर्ण करणं सदस्यस्थितीत सोपं काम नाही. गोपाळपूरमध्ये आम्ही सुरु केलेल्या मातोश्री वृध्दाश्रमासाठी शिवसेनेच्या वतीने सहकार्य लाभलेलं आहे. महेश साठे हे सुध्दा शिवसेना या पक्षात आहेत त्या पक्षाचं ब्रीद पाळुन याचं कार्य सुरु आहे. हे अनुकरणीय असंच आहे. अशी प्रतिक्रिया ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी व्यक्त केलीय.

