👁 11 Views

पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर शहराच्या पिण्याचे पाण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले


Pandharpur Live-   
                     सोलापूर : उजनी धरणातून पंढरपूर, मंगळवेढा व सोलापूर शहराला पिण्यासाठी आज सकाळी 6 वाजल्यापासुन पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या औंज बंधार्‍यात पाणी पोचल्यानंतर धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे. 
                धरणातून सुरवातीला कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. हळूहळू भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यात येणार आहे. धरणातून भीमा नदीमध्ये जवळपास सहा हजार क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. सोलापूर शहर, पंढरपूर, मंगळवेढा या शहराला पिण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. जवळपास 10-12 दिवसांनी हे पाणी औज बंधार्‍यात पोचण्याची शक्यता आहे.
   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाच टीएमसी एवढे पाणी सोडले जाणार आहे. नियोजनात ठरल्यानुसार हे पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा वजामध्ये गेल्याने त्यातूनच आता पाण्याचा उपसा होणार आहे.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा सध्या वजा 16 टक्याच्या पुढे गेला आहे. कालव्यातून व बोगद्यातूनही सध्या पाणी सोडले जात आहे. त्यातच आता भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील उपयुक्त पाणीसाठा खूपच कमी होणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *