Pandharpur Live-
गडहिंग्लज ता .03 येथील गडहिंग्लज तालुका शिवसेना यांच्या वतीने घेण्यात आलेले रक्तदान शिबिर मोठया उत्साहात पार पडले . या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पुजनाने झाले . शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे , नगराध्यक्षा सौ . स्वाती कोरी , गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले . औषधांचे वाटप , यावेळी झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे सहसपंर्क प्रमुख प्रा . सुनिल शिंत्रे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला . यावेळी शिवसेनेच्या वतीने गेली 3 महीन्याच्या काळात गरजू कुटुंबांना धान्यवाटप , रोगप्रतीकारकशक्ती वाढविण्या – या सोशल मिडियावर जनजागृती यासारखे विविध उपक्रम राबविल्याची माहिती दिली .
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
यावेळी कोरोना सदृश्य साथीच्या काळामधील विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तिचा सत्कार करण्यात आलेला . यामधील 74 दिवस कोरोना विषयी समाज प्रबोधन केल्याबद्दल बाळासाहेब पाटील कडगांव , 73 वेळा रक्तदान केलेले मिलींद कोवाडकर हडलगे , रक्तदान शिबिर आयोजित केलेले मौलना पटेल , अशपाक मकानदार , कोरोना काळात गडहिंग्लज शहरामध्ये चांगली कामगीरी केल्याबद्दल व रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल नगरसेवक महेश उर्फ बंटी कोरी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख देवणे म्हणले गेली 3 महिन्याच्या काळामध्ये कोरोनाच्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे . त्याच बरोबर त्या आजरातुन बरे होणारे रूग्णांची संख्याही चांगली आहे . प्रसार माध्यमाने बरे होणा – या रूग्णांचे आकडे समाजासमोर आणल्यास व त्याला चांगली प्रसिध्दी दिल्यास लोकांच्या मनातील कोरोनाची कमी होण्य मदत होईल . यावेळी बोलताना नगराध्याक्षा सौ . कोरी म्हणाल्या गडहिंग्लज शहरात प्रशासन व नागरीक यांच्या सहकार्यामुळे शहरामध्ये अध्याप एकही रूग्ण सापडला नाही . यावेळी गटविकास अधिकरी शरद मगर यांनीही मनोगत व्यक्त केले . लायन्स ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले .
या कार्यक्रमाला पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड , पोलिस उपनिरिक्षक दिनेश काशीद , मुख्याधिकारी नागेश मुतकेकर , उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक दिलीप आंबोळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . अथणी , नगरसेविका श्रध्दा शिंत्रे , शहरप्रमुख सागर कुराडे , प्रकाश मुरूकुटे , प्रतिक क्षीरसागर , अवधुत पाटील , संजय पाटील , संजय संकपाळ , प्रकाश रावळ , भरत जाधव , महादेव पाटील , मंगल जाधव , दिनेश कुंभीरकर , महेश पाटील , अभिषेक जाधव , आनंदा माने , रोहण माने , अरूण किल्लेदार , संतोष गुरखा यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपिस्थीत होते . अमोल देसाई यांनी सुत्रसंचलन केले व तालुका प्रमुख दिलीप माने यांनी आभार मानले .
फोटो आशपाक किल्लेदार.

