सोलापूर : रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू, सोलापुरातील घटना

Loading


 Pandharpur live :रेल्वेच्या धडकेत चोवीस वर्षाच्या तरूणाच्या शरीराचे अक्षरशः दोन समान तुकडे झाले आहेत. रेल्वे त्याच्या पोटावरून गेल्याने त्याचे दोन भाग झाले. धीरज प्रभू कांबळे (वय २४, रा मंगल रेसीडेन्सी डी मार्टच्या पाठीमागे) असे त्या तरूणाचे नाव आहे.

शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कल्याणनगर येथील रेल्वे ट्रॅकजवळ त्याचा मृतदेह आढळला. त्याला अज्ञात रेल्वेने धडक दिली. तरी धीरज याच्या पोटावरून रेल्वे गेल्याने त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते.

यावेळी त्याचे अवयव रूळ परिसरात पसरले होते. दरम्यान, या घटनेची माहिती विजापूर नाका पोलिसांना कळताच हवालदार एस. टी बहिर्जे हे यांनी घटनास्थळी जाऊन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, धीरजच्या खिशात मोबाईल आढळल्याने त्यावरून पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्याला एकूण तीन भाऊ असून तो गुरूवारी रात्री पासून घरात नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *