School Firing: शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार; 7 शिक्षक ठार

Loading


Pandharpur live : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील खुर्रम जिल्ह्यात गुरुवारी हल्लेखोरांनी शाळेच्या स्टाफ रूममध्ये घुसून गोळीबार केला. या घटनेत ७ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

हे कृत्य दहशतवाद्यांनी केले की वैमनस्यातून घडले आहे, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, येथून जवळच झालेल्या आणखी एका गोळीबारात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही आणि हल्लेखोरांबाबत कोणताही सुगावा मिळालेला नाही.

शिक्षकांवर हल्ल्याची घटना खुर्रम जिल्ह्यातील टेरी मंगल हायस्कूलमध्ये घडली. येथील स्टाफ रूममध्ये शिक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा संच तयार करत होते. पुढील आठवड्यापासून येथे सुरू होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.


कारमधून काही हल्लेखोर येथे पोहोचले. शाळेबाहेर बॅरिकेड्स लावले होते. पोलिसही उपस्थित होते. हल्लेखोरांनी बॅरिकेड्स तोडून शाळेत प्रवेश केला आणि थेट स्टाफ रूम गाठली. येथे पोहोचताच गोळीबार सुरू झाला. गोळीबारात स्टाफरूममधील सर्व 7 शिक्षकांचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर त्याच गाडीतून पळून गेले.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हे प्रकरण शिया-सुन्नी वादाशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. मारले गेलेले सर्व शिक्षक शिया समुदायातील असल्याचेही सांगण्यात येत आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे

दरम्यान, या हायस्कूलपासून 6 किमी अंतरावर दुचाकीवरून जात असलेल्या आणखी दोन शिक्षकांवरही गोळीबार झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गुरुवारी तालिबानने खैबर पख्तुनख्वा प्रांतातील या खुर्रम भागातील दिरदोनी येथे केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या 6 सैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. लष्कराने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

याच भागात दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने अब्दुल जब्बार शाह या तालिबानी म्होरक्याला ठार केले होते. यानंतर तालिबानने बदला घेण्याची धमकी दिली. त्यामुळेच तालिबानने पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.

वास्तविक, हा परिसर अफगाणिस्तानला लागून आहे. येथे लष्कर तालिबानविरोधात कारवाई करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या या कारवाईत 19 जवान आणि 2 दहशतवादी मारले गेले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *