Maharashtra News: हृदयद्रावक! एकुलत्या एक मुलाने स्टेटसला फोटो ठेवून केली आत्महत्या…

Loading

Pandharpur live: व्हॉट्सऍप स्टेटसला स्वत:चा फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळंबा येथे घडली आहे. अवधूत अजित डाकवे (वय 24, रा.डाकवे गल्ली, मंगळवार पेठ, सध्या कळंबा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

अवधूत आणि त्याची आई सुरेखा हे दोघेच मंगळवार पेठेतील डाकवे गल्लीत राहत होते. अवधूत्या लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर आईने त्याचा सांभाळ केला होता. आई एका खासगी दवाखान्यात नोकरी करत होते. आई जेवण करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. अवधूतने दुसऱ्या खोलीत मोबाईलवर स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे हा स्टेटस मित्रांसह नातेवाईकांनी पाहिल्यानंतर त्याला तातडीने फोन केला, पण त्याचा फोन बंद होता. स्टेटस अपडेट केल्यानंतर अवधूतने लोखंडी पाईपला टॉवेलने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. गळफास सोडवून अवधूतला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने आईला धक्का बसला आहे. अवधूतच्या लग्नासाठी प्रयत्न सुरु होते. पण, अवधूतने घर बांधून लग्न करु असे आईला सांगितले होते. त्यामुळे कळंब्यात भाड्याने राहात होते. अवधूतने केलेल्या आत्महत्येमुळे आईला धक्का बसला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *