👁 9 Views

पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील पालखी मार्गाच्या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे.. ग्रामस्थांचा ठेकेदाराविरुध्द आंदोलनाचा इशारा


Pandharpur Live –

                              शिरढोण, ता. पंढरपूर (प्रतिनिधी):

पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील  पालखी मार्गावरील नविन पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप शिरढोण ग्रामस्थांकडून होत आहे. पावसाळ्यात पंढरपूर आणि शिरढोण-कौठाळी-होळे या गावांचा संपर्क तुटत होता. सततच्या पाठपुराव्यामुळे तो पुल शासनाने मंजूर केला परंतु त्या फुलाच्या कामासाठी दोन वर्ष कालावधी गेला. त्यामध्ये देखील पुलाच्या दोन्ही बाजूंनी साईड पट्टी तयार न करता रस्त्याचे काम करण्यात आले आहे. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


प्रत्यक्षात शासनाच्या नियमानुसार रस्त्याचे काम झाले नसून डांबरी रस्ता देखील अरुंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता आहे. पीडब्ल्युडी च्या अधिकार्‍यांनी याकडे वेळीच लक्ष देऊन रोडच्या दोन्ही बाजूंनी साईड पट्टी तयार करून काम चांगलं करावे अन्यथा अधिकारी आणि ठेकेदाराच्या विरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *