👁 10 Views

कलेक्टर साहेब सोलापूर मध्ये सर्वसामान्य रूग्णांना दवाखान्यात दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणा-या मुजोर डॉक्टर व खाजगी दवाखान्यांचा बंदोबस्त करा


Pandharpur Live –

एकीकडे सोलापूर शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा वाढतोय तर दुसरीकडे सोलापूर शहरातील काही मुजोर डॉक्टर स्वतःच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य सोलापूर मधील रूग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत असे निदर्शनास येत आहे.  ही बाब निश्चितच गंभीर आहे.  सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी या बाबत गांभीर्याने दखल घेवून अशा बेजबाबदार व मुजोर डॉक्टर आणि त्यांच्या हॉस्पिटल विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी सोलापूरकरांमधुन होत आहे. 

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
सोलापूर शहरात सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.  परंतु याच काळात सोलापुरातील अनेक वयोवृद्ध नागरीकांना दैनंदिन आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. 
कन्टेमेंट झोनमध्ये नसलेल्या लोकांनाही कोविड-90 ची टेस्ट आधी करा आणि मग दवाखान्यात भरती व्हा! असा अलिखित आदेश दिला जातोय. 
अशा परिस्थितीत वयोवृद्ध नातेवाईक पेशंटला घेवून विविध दवाखान्यांच्या पाय-या झिजवत आहेत. तात्काळ उपचार मिळाले नसल्याने काही वयोवृद्ध सोलापूरकरांचा मृत्यू झाल्याचेही समजते. 
ही बाब नक्कीच गांभिर्याने घेण्यासारखी आहे.  आणि प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी आहे. 
याकडे सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करणे आणि परिस्थिती वर नियंत्रण मिळवणे अपेक्षित आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *