👁 6 Views

विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी केला बलात्कार… दोन तरूणांसह एका बलात्काराचा व्हिडिओ तयार करणा-या तरूणीवर गुन्हा दाखल


Pandharpur Live Online-

नागपूर – अकरावीच्या विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी बलात्कार केेेेल्याची  संंतापजनक घटना घडली आहे. बलात्कार प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सदर आरोपी सतत शरीर सुखाची मागणी करू लागले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांवर आणि व्हिडिओ तयार करण्याऱ्या तरूणीवर गुन्हा दाखल केला आहे.


वस्तीत राहणाऱ्या तरूणाशी तरूणीची ओळख झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आले आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. गाठीभेटी वाढल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. तरूणाने मोबाईलने शारीरिक संबंधाचे व्हिडिओ तयार केले. फोटो काढले.


९ मार्च २०२० रोजी तरूणी ट्युशनवरून येत असता. तिला रस्त्यात अडवण्यात आले.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

त्यावेळी तरूणाने आपल्यासोबत येण्याची मागणी केली पण तरूणीने तात्काळ नकार दिला. यावेळी मोबाईलमधील व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. त्यामुळे तरूणी तरूणासोबत निघून गेली.


तरूणाने प्रियसीला मित्राच्या घरी नेले. तेथे तो मित्र आणि त्याची मैत्रिण होती. तरूणाने तेथे देखील तरूणीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. विरोध केल्यावर तिचे कपडे फाडले. या सगळ्या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ उपस्थित असलेल्या दोघांनी केले. व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी तरूणीला देत आले.


वारंवार तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करायला लागले. या त्रासाला कंटाळून तिने अखेर सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. बलात्कार करणाऱ्या दोघांवर आणि व्हिडिओ करणाऱ्या तरूणीवर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *