पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
‘मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव लवकरच मिळेल. WHO ने धारावीचं उदाहरण साऱ्या जगाला दिले आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही मुंबईत लपवाछपवी नाही असं म्हंटलं आहे. विरोधक काय म्हणतायत त्याकडे लक्ष देत नाही. देवच म्हणतोय मी तुमच्यातच आहे, मंदिरात येऊ नका. लॉकडाऊन आहेच, एकेक गोष्टी सोडवत आहे’, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
‘घाईघाईन लॉकडाऊन लावणे आणि उठवणे चूक ठरु शकते. घिसाडघाईनं लॉकडाऊन उठवले न् साथ पसरली तर जीव जातील. ‘जीव गेला तरी बेहत्तर लॉकडाऊन उठवा’ याची आहे का तयारी ? मी म्हणजे ट्रम्प नाही, डोळ्यासमोर माझी माणसे तडफडू देणार नाही. लॉकडाऊनच्या विरोधकांनी एकदा काय ते ठरवावे. लॉकडाऊन उठवले तर घरंच्या घरं रिकामी होऊन टाळे लागतील. अख्खे कुटुंबच मरण पावले तर घराचे टाळे कोण उघडणार ?’, असा प्रश्नही यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
‘लसीचे प्रयोग सुरु झालेत, काही महिन्यात लस येईल म्हणत आहेत. डिसेंबर अखेर देशात लस उपलब्ध होईल असं सध्या चित्र आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘दूध उत्पादकच काय, कुणाच्याच मालाला भाव मिळेना, सगळेच लोक अन्याय होतोय म्हणत असतील तर ते योग्य नाही. केंद्राची 38 हजार कोटींची मदत हळूहळू येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारचेही उत्पन्न घटलेले आहे. महसूल वाढवायचा तर कोणाकडून वसूल करावा सांगा ? सध्या तरी ‘पी हळद अन् हो गोरी’ असा उपाय नाही’, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

