👁 12 Views

श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी अभिनेते आदेश बांदेकर यांची 3 वर्षांसाठी पुनःश्च निवड

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-

मुंबई: होम मिनिस्टर फेम प्रसिद्ध अभिनेते, महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांची पुन्हा श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवारी पुढील तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली, असे राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे नेतेपदही आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

आदेश बांदेकर यांनी सप्टेंबर 2009 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. 2009 च्या विधानसभा निवडणुका त्यांनी माहीम मतदारसंघातून लढवली.

मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात आपले काम चालू ठेवले.

2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तीन वर्षांपूर्वी (जुलै 2017) आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *