पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
पुण्यात मावशी आणि तिच्या प्रियकराने १६ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाउन काळात मावशी व तिचा प्रियकर तिच्या अल्पवयीन भाचीला तिच्या इच्छेविरोधात अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक शोषण करत होती. याप्रकरणी मावशीला व तिच्या प्रियकराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. एप्रिल महिन्यात हा प्रकार घडल्याचं समजतंय. धीर एकवटत पीडित मुलीने आपल्या आईला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आईने कोंढवा पोलीस ठाण्यात आपली बहिण आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांनीही या प्रकरणात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन मावशी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
एप्रिल महिन्यात लॉकडाऊन काळात पीडित मुलीची आई आपल्या ४ मुलांना बहिणीकडे सोडायची.
दरम्यान, दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कोरोना चाचणी केली आहे. दोन्ही आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तथापी, गंभीर गुन्हा असल्यामुळे न्यायालयानेही आरोपींना कोठडीत टाकण्याची परवानगी दिली आहे. परंतू कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जेल प्रशासन आरोपींना दाखल करुन घेत नाही आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या या आरोपींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

