सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 345 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्ह्यात आज सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत.
आज पंढरपूर तालुक्यामध्ये एकुण 124 नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 5902 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.(यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे) यापैकी आजतागायत एकुण 172 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2397 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकुण 3333 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
बघा आजचा रिपोर्ट!








