👁 6 Views

मायलेकीची आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

 मळनेर (जळगाव) : अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे आईसह मुलीने आत्महत्या  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 


नीम (ता. अमळनेर) येथील समाधान जहाँगीर कोळी यांची पत्नी जयश्री समाधान कोळी (वय ३०) व मुलगी नंदिनी समाधान कोळी (वय ८) यांनी 


कळमसरेशिवारात वीज उपकेंद्रासमोरील नीम रस्त्याला लागून असलेल्या भाकचंद जैन यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 


जयश्री कोळी या तीनच्या सुमारास कळमसरे बसस्थानकावर मुलीला घेऊन बसल्या होत्या. मुलीला बिस्कीट व पाण्याची बाटली घेऊन पायी नीम गावाकडे रस्त्याकडे निघाल्या होत्या. दोघींच्या पायात चप्पलही नव्हती. कळमसरे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील विहिरीत उडी मारून या दोघींनी जीवनयात्रा संपविली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *