👁 8 Views

कार अपघातात 5 ठार 8 जखमी

 मुंबईत वांद्रे वरळी सागरी सेतू येथे कार अपघातात जखमी झालेल्या 13 जणांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला.


इतर 8 जणांवर उपचार सुरू आहेत. अपघात आज (बुधवार 5 ऑक्टोबर 2022) पहाटे झाला.

वेगाने चाललेल्या कारची एका अँब्युलन्स तसेच आणखी तीन-चार कारशी जोरदार धडक झाली. अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या अपघातात चार-पाच वाहनांचे नुकसान झाले


 तसेच 13 जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या 13 जणांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला तर इतर 8 जणांवर उपचार सुरू आहेत.


पोलीस पथकाने अपघातस्थळी पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. सागरी सेतूवरील कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून घटनेबाबत आणखी माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे स्वरुप गंभीर होते. यामुळेच जखमी झालेल्या 13 जणांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *