👁 6 Views

महामार्गावर शिंदे गटांच्या वाहनाचा अपघात

 शिवसेना बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण व्हायच्या आधीच त्यावरून मुंबईकडे दसऱ्या मेळाव्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वाहनांना अपघात घडला.

अचानक ब्रेक दाबल्याने चार वाहने धडकली.

यात १० ते १२ कार्यकर्ते जखमी झाले, परंतु वाहनांचे मोठे नुकसान झाले. समृद्धी महामार्गावरील जठवड्याजवळ मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला. जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांचे समर्थक असलेले कार्यकर्ते चार वाहनांतून मुंबईकडे निघाले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *