👁 8 Views

लग्नाच्या चार महिन्यात जुळी मुले जन्मली म्हणून द्यावे लागणार स्पष्टीकरण…

 दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश यांनी रविवारी सोशल मीडियावर मुलांचे पाय दिसत असलेले फोटो पोस्ट करत जुळ्या मुलांचे स्वागत केल्याची घोषणा केली .


विघ्नेशने “नयन आणि मी अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्हाला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला आहे,”असं कॅप्शन दिलं आणि सर्वांनाच आश्चर्यचा सुखद धक्का दिला. लग्नाच्या चार महिन्यात मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला असावा अशी चर्चा रंगली आहे.


यावर्षी जानेवारीपासून भारतात सरोगसी ही बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय स्थितीमुळे जोडप्याला मुलं जन्मास घालण्यास अडचण असेल तेव्हा सरोगसी पर्याय असतो. त्यामुळे तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी वैद्यकीय सेवा संचालनालयाल या प्रकरणी या जोडप्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचे स्पष्ट केले.

सोमवारी, चेन्नई येथे पत्रकार परिषदेदरम्यान चार महिन्यांपूर्वी लग्न झालेले जोडपे सरोगसीद्वारे गर्भधारणा करू शकतात का आणि वेळेचे काही बंधन आहे का? असा प्रश्न जेव्हा तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या सरोगसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


परंतु सरोगसीद्वारे पालक बनणाऱ्या व्यक्तींचे वय २१ वर्षांच्या पुढे आणि ३५ वर्षांच्या आत असेल आणि त्यांच्या घरच्यांची संमती असेल, तर कायद्याने त्यांना सरोगासीचा मार्ग स्वीकारण्यास परवानगी असते. तसेच यासंदर्भात वैद्यकीय सेवा संचालनालयाला चौकशी करण्याचे आणि जोडप्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश दिले जातील असे सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *