👁 8 Views

पहिल्या शाकाहारी मगरीच्या मृत्यूने हळहळ, अंत्ययात्रा काढत कुठे आणि कुणी दिला भावपूर्ण निरोप ?

 गभरातील प्राणी प्रेमींच्या काळजाला चटका लावणारी घटना केरळमधून समोर आली आहे. एका 75 वर्षांच्या मगरीचं निधन झालं आहे


विशेष म्हणजे ही मगर शाकाहारी होती. एक मंदिराजवळच्या तलावात तिचं वास्तव्य होतं. पण तिने कधीच कोण्या भाविकाला जखमी केलं नाही, असं मंदिराशी संबंधित लोकं सांगतात. 


चक्क अंत्ययात्रा काढत या शाकाहारी मगरीला  भावपूर्ण निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे दिवसातून दोन वेळा ही मगर देवदर्शन करण्यासाठी मंदिर परिसरात यायची, असंही सांगण्यात आलंय. ही घटना आहे केरळच्या कारागोड येथील.


केरळ राज्यातील कासरगोड इथं श्री अनंदपद्मनाभ स्वामी मंदिराची रक्षक म्हणून ज्या मगरीकडे पाहिलं जातं, त्या बाबिया नावाच्या मगरीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय. अनंतपुरा गावातील मंदिराच्या तलावात बाबिया मगरीचा मृतदेह आढळला. मागच्या रविवारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *