👁 7 Views

धक्कादायक, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मुलाची सख्ख्या आईला अमानुष मारहाण

 आपल्या मुलांसाठी आई असंख्य गोष्टीत त्याग करते, त्यांच्या आडीनिवडी जपण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. पण मोठं झाल्यावर याच मुलांना आई नकोशी होते. 


अशाच एका मुलाने आपल्या आईला अमानुषपणे मारहाण केली आहे.याप्रकरणी आईने मुलाविरोधात तक्रार दिली आहे.


वैजयंता जाधव असं या आईचं नाव असून त्या इंदापूर तालुक्यातल्या पळसदेव इथं राहतात. त्यांनी आपल्या मुलाविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, 

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २४ तारखेला वैजयंता यांच्या मोठ्या मुलाने त्यांना मारहाण केली. शिवीगाळ दमदाटी केली. या मुलाने त्यांना लाकडाचा ओंडकाही फेकून मारला.


या मारामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना चक्कर येऊ लागली. 

त्यामुळे त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांना दवाखान्यात नेलं आणि त्यानंतर दोघांनी काल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. 


त्यानुसार पोलिसांनी मुलगा दिलीप याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही मारहाण करण्याचं कारण अद्याप कळलं नाही. इंदापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *