माजी पोलीस अधिकारी व सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
महाराष्ट्र पोलीस दलात भाऊसाहेब आंधळकर यांचे मोठे नाव आहे. २०१२ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये आंधळकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे
आंधळकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख कोकीळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्थानिक राजकारणात विरोधकांचा मोठा त्रास सहन करावा लागला,
मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील नेत्यांनी साथ दिली नाही, असा आरोप आंधळकर यांनी केला आहे.
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून विरोधकांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप आंधळकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला
दरम्यान, येत्या महिनाभरात बार्शी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून यामध्ये शेकडो कार्यकर्त्याचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे




