वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे अनेक लोक आहेत, ज्यांना प्राण्यांसंबंधीत व्हिडीओ पाहायला फार आवडते. या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ हे खूपच सुंदर असतात.
काही व्हिडीओ हे अंगावर काट आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो मगरीशी संबंधीत आहे.
आपल्याला माहित आहे की मगर ही अशा भक्ष्य प्राण्यांपैकी एक आहे, ज्याचं नाव जरी काढलं तरी लोकांच्या पोटात गोळा येतो. पण या व्हिडीओमधील लोक काही वेगळंच करताना दिसले. या व्हिडीओमध्ये मगरीच्या पोटात अडकलेल्या मित्राला वाचवण्यासाठी दुसरे दोन मित्र धावून आले. तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती मगरीच्या शेपटीला धरुन आहे.
तर दुसरा मित्र मगरीच्या पोटातील व्यक्तीला तोंडाकडून बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत आहे.



