लोकल ट्रेन, मेट्रो यामुळे आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर पार करू शकतो. दिवसेंदिवस या सेवा अधिक तत्पर होताना दिसत आहेत. एका लहान मुलाला थेट त्याच्या घरापर्यंत सोडणाऱ्या मेट्रोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोस्ट केल्यानंतर या व्हिडिओला ६.६ मिलियन पेक्षा अधिकवेळा पाहण्यात आलंय आणि ४५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक महिला घरी बसून मोबाईल फोनचा वापर करत आहे.
काहीवेळानंतर अपार्टमेंटच्या फरशीचा एक भाग उघडतो आणि मेट्रो ट्रक बाहेर येतो. मेट्रोसारखी रचना असलेली ट्रेन दिसते आणि अपार्टमेंटमध्ये येऊन उघडते.



