प्रसिद्ध श्रद्धा वालकर खून प्रकरणाची आग शमली नसतानाच आता आणखी एक वेदनादायक प्रकरण समोर आलंय.
उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. याला गावप्रमुखानेही दुजोरा दिला आहे. गदरपूरच्या महतोष गावात राहणारा तरुण केरळमधील कोची येथील एका ब्युटी पार्लरमध्ये सहा वर्षांपासून काम करत होता. यादरम्यान त्याची एका मुलीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांत संवाद सुरू झाला आणि ते एकमेकांवर प्रेम करु लागले. प्रेम इतकं वाढलं की, दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास होकार दिला आणि राहायला सुरुवात केली.
3 डिसेंबरला दोघांत काही गोष्टीवरून आपापसात वाद झाला. त्यानंतर प्रियकारनं प्रेयसीचे दोन्ही हात कापले. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या वृत्ताबाबत तरुणाच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितलं की, ‘हा तरुण 23 नोव्हेंबरला आपल्या बहिणीच्या लग्नाला आला होता. लग्नानंतर तीन दिवसांनी तो निघून गेला.’ गावप्रमुख नवी जान म्हणाले, मी याबाबतचं वृत्त न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर पाहिलं. या भागातील काही तरुण केरळमधील कोची इथं पार्लरमध्ये काम करतात, असं सांगितलं जात आहे. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि वाद झाल्यानंतर तरुणानं तरुणीचे दोन्ही हात कापले. याबाबतची अधिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाहीये.



