👁 4 Views

दोन युवकाला चिरडणाऱ्या ट्रक चालकाला केले जेरबंद

 

वडकी पोलिस ठाणे हद्दीत येणार्‍या  खडकी गावाजवळ अपघातात दोन युवकाला चिरडणार्‍या ट्रक चालकाला चंद्रपूर येथून वडकी पोलिसांनी अखेर अटक केली.


वडकी ते राळेगाव मार्गावर 4 डिसेंबर 2021 रोजी वडकी येथील मयूर कैलास केराम (वय 18 वर्ष) व पवन उर्फ बंटी जगदीश चांदेकर (वय 21 वर्ष) हे दोन युवक पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्याकरिता राळेगाव रोडने गेले होते.


खडकी गावाजवळ पहाटे 6 च्या दरम्यान रोडवर व्यायाम करीत असताना  वडकीकडून भरधाव वेगात येणार्‍या ट्रकने या दोन्ही युवकाला जबर धडक मारून चिरडले होते यात मयूर केराम याचा जागीच मृत्यू झाला होता. तर बंटी चांदेकरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघातानंतर घटनास्थळवरून ट्रकचालकाने मदत न करता फरार झाला होता. या प्रकरणी घटनेच्या दिवशी वडकी पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.


वडकी पोलिस सुमारे एक वर्षांपासून ट्रक चालकाचा शोध घेत होते. अशातच संबंधित उपलब्ध असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पडताळणी वरून या प्रकरणात तांत्रिक दृष्टीकोनातून तपास करून अपघात करणारा ट्रक क’ एमएच34 एबी6399 असल्याचे निष्पन्न झाल्याने वाहनाबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर येथे वडकी पोलिसांनी जाऊन प्रत्यक्ष भेटून या वाहनाची माहिती प्राप्त करून गुन्ह्याची माहिती दिली.

यात अपघात करणारा ट्रक क्र. एमएच34 एबी6399 चालकासह चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प येथून वडकी पोलिसांनी ताब्यात घेतला. या अपघातातील आरोपी ट्रकचालक रशीदखा बशीरखा पठाण (वय 55 वर्ष, लक्ष्मीप्रसाद वार्ड, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कलम 279, 338, 304 (अ) भादंवि अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, जिल्हा अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विनायक जाधव, पोलिस उपनिरीक्षक सूरजप्रकाश ओझा, रमेश मेश्राम, किरण धडसे, किरण दासरवार यांनी ही कारवाई पार पाडली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *