👁 4 Views

चोरट्यांचा धुमाकूळ, कोयत्यांचा धाक दाखवत दागिने चोरले

 शिक्रापूर : पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे अज्ञात पाच चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून कोयत्यांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सोने काढून घेत घरातील दागिने चोरुन नेले. जाताना घराच्या कड्या बाहेरुन लावल्या. त्यानंतर नागरिक घरावरील कौले काढून बाहेर आले. 


याबाबत निलेश बाळासाहेब धुमाळ (वय ३६, रा. कमळाईवस्ती, पिंपळे खालसा, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पाच अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.


    पिंपळे खालसा येथील कमळाई वस्तीवर राहणारे निलेश धुमाळ व त्यांचे कुटुंबीय घरात झोपले असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात चोरटे दरवाजा तोडून घरात आले. 


    त्यांनतर निलेश व त्यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवत गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले काढून घेतले. घरातील कपाट उघडून पाहणी केली तसेच यावेळी दोघांनी शेजारील घरात जाऊन येथील दागिने देखील काढून घेत निलेश जवळील दोन्ही मोबाईल देखील घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *