👁 3 Views

लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू , नवरदेवासह 40 हुन जास्त जण होरपळले

 

राजस्थानमधील जोधपूर इथं आग लागून मोठी दुर्घटना घढली आहे. लग्न सोहळ्यावेळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून यात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ४० पेक्षा जास्त लोक गंभीररित्या भाजले आहेत.


सर्व जखमींना उपचारासाठी जोधपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३५ पेक्षा जास्त लोक हे ६० टक्के तर ११ जण ८० ते ९० टक्के भाजले आहेत. लग्न सोहळ्यावेळी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ झाला.



तर मंडपात असलेले लोक आगीत होरपळले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जोधपूरमधील भूंगरा गावात ही दुर्घटना घडली असून आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. जिल्हाधिकारी हिमांशु गुप्ता यांनी दिलेल्या माहितानुसार, या दुर्घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू झाला.



यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. काही लोक गंभीररित्या होरपळले आहेत. सिंलिंडर स्फोटमुळे घराचे छतही कोसळले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *