👁 4 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “व्यक्तीमत्व विकास” या विषयावर व्याख्यान

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रा. आय. आय. मुजावर यांचे “व्यक्तीमत्व विकास” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


   या व्याख्यानाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यादरम्यान व्याख्याते प्रा. आय. आय. मुजावर यांचा परिचय प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांचे हस्ते प्रा. आय. आय. मुजावर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


    यादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. मुजावर म्हणाले, शालेय जीवनात व्यक्तीमत्व विकास होत असतो. या व्यक्तीमत्व विकासाच्या जोरावर आपली शैक्षणिक जडणघडण होत असते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर मेहनत घेतल्यास आयुष्यात नक्की यश प्राप्त होईल असे मत प्रा. आय. आय. मुजावर यांनी व्यक्त केले.


   हे व्याख्यान प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड मध्ये “व्यक्तीमत्व विकास” याविषयावर बोलताना प्रा. मुजावर समोर उपस्थित विद्यार्थी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *