👁 4 Views

कंपनीमध्ये चोरी करणाऱ्यांवर गुन्हा

 शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) कल्याणी फोर्जिंग कंपनी मधील कंपनीचे स्पेअर पार्ट चोरुन नेणाऱ्या कामगारावर गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरी करणाऱ्या दीपनारायण रामप्रमोद तिवारी याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


 कल्याणी फोर्ज कंपनीमध्ये दीपनारायण तिवारी हा कामगार आहे. या कंपनीमधील एस एस कास्टिंग नावाचा पार्ट नसल्याचे कंपनी व्यवस्थापकाला दिसले त्यामुळे त्यांनी कंपनी मधील सीसीटीव्हीची तपासणी केली असता कंपनीतील दीपनारायण तिवारी याने सदर पार्ट चोरून नेल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले. 


याबाबत संदीप आनंदा चव्हाण (वय ३८ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली


 असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दीपनारायण रामप्रमोद तिवारी (रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बरेली जि. बरेली मध्यप्रदेश) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *