👁 4 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “मिशन साहसी” या विषयावर मार्गदर्शन

रोटरी क्लब पंढरपूर, सिंहगड काॅलेज व सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने व्याख्यान संपन्न 

पंढरपूर: प्रतिनिधी

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम व पंढरपूर रोटरी क्लब यांच्या संयुक्त


 विद्यमानाने “ती लढली म्हणून आम्ही घडलो” या विषयावर पंढरपूर पोलीस स्टेशन येथील दामिनी पथक प्रमुख कुसुम क्षिरसागर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


    सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दामिनी पथक प्रमुख कुसुम क्षिरसागर यांचे स्वागत


 सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरमच्या चेअरमन प्रा. अंजली पिसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.


    या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. नरसिंह बडवे, आदिती उत्पात उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी ऋतुजा गायकवाड, श्रद्धा कुलकर्णी, नागेंद्रकुमार नायकुडे सह महाविद्यालयातील बापू माने यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *