👁 4 Views

लग्नातल्या पंगतीला जेवण वाढून घरात गेला ; गळफास घेऊन संपवलं जीवन , तरुण शेतकऱ्याच संशयास्पद मृत्यू

 

बुलढाण्यात एक दु:खद घटना घडली आहे. गावातील एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. लग्नातल्या पंगतीला जेवण वाढून घरी गेल्यावर त्याने स्वत:चे जीवन संपवले.


राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या संशयास्पद मृत्यूने गावात त्याच्याच मृत्यूची चर्चा सुरू आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील आडविहीर येथे ही घटना घडली आहे. गजानन निवृत्ती नाफडे (वय वर्षे ३६) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 रविवारी गावातल्या एका लग्नात गजानन गेला होता. त्याने सर्व पाहुण्यांना जेवण वाढले. त्यावेळी तो पुढे स्वत:चे जीवन संपवेल याची कुणालाही काहीच क्लपना नव्हती. लग्न समारंभ अटोपल्यावर तो घरी गेला. मध्येच त्याच्याबरोबर नेमके काय घडले याची कुणालाही कल्पना नाही.


लग्नातून सायंकाळी ७ च्या सुमारास घरी  आल्यावर त्याने गळफास लावून घेतला. त्याच्या घरच्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात  दाखल केले. मात्र उपचारांआधीच त्याचा मृत्यू झाला होता. गजाननच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेबाबत त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, काही दिवस आधी तो स्वत:च्या जीवाचे काही बरेवाईट करेल असे म्हणत होता. मात्र तो मसकरी करत असावा म्हणून आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *