👁 5 Views

प्रेमविवाहानंतर पत्नीचा खून करून मृतदेहाचे तुकडे टाकले भटक्या कुत्र्यांना ……

 

साहिबगंज येथे एकाने पत्नीचा खून केला व कटरने मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते भटक्या कुत्र्यांसमोर टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वीच दोघांनी प्रेमविवाह केला होता.


रुबिका पहाडीन (वय २२) असे महिलेचे नाव आहे. पती दिलदार अन्सारीसह ८ नातेवाईकांना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


रुबिका ही पहाडिया या आदिवासी समुदायाची होती. ती विवाहानंतर पती दिलदारसोबत बेलटोला येथे राहत राहत होती. दिलदार याचा हा दुसरा विवाह होता. त्याची पहिली पत्नीही त्याच्यासोबत राहत होती. पोलिसांना आतापर्यंत मृतदेहाचे १८ तुकडे सापडले आहेत. यासोबतच एक शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. रुबिकाच्या खुनासाठी दिलदारला त्याच्या कुटुंबीयांनी मदत केल्याचा संशय आहे. दिलदारचे वडील मो. मुस्तकीम अंसारी, आई मरियम खातून, पत्नी गुलेरा, भाऊ अमीर यांची चौकशी करत आहेत.


रुबिका आणि दिलदार यांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते; पण दोघांचेही कुटुंब लग्नासाठी तयार नव्हते. महिनाभरापूर्वी दोघांनी घरातून पळून जात पोलिस ठाणे गाठले असता पोलिसांनी दोघांचे लग्न लावून दिले होते. लग्नानंतर काही दिवसांतच कुटुंबात भांडणे होऊ लागली. त्यामुळे दिलदारने रुबिकाला संपविण्याचा कट रचला आणि खून केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *