👁 2 Views

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “ग्रामीण भागातील उद्योजकता” या विषयावर कार्यशाळा संपन्न

प्रसिद्ध उद्योजक भूषण कोठडिया यांचे बहुमोल मार्गदर्शन. 

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता, उद्योजक होण्यासाठी अथक परिश्रम करावेत. संयम आणि आत्मविश्वास हेच यशस्वी उद्योजक होण्याचे गमक आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक श्री भूषण कोठाडिया यांनी केले. कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय, शेळवे येथे दिनांक १६ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या  “ग्रामीण भागातील उद्योजकता” या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. संदीप सावेकर यांनी केले. 


यावेळी भूषण कोठाडिया यांनी विद्यार्थ्यांना उद्योगासाठी असणाऱ्या सरकारी विविध अनुदानाविषयी सविस्तर माहिती दिली. स्वतः चा व्यवसाय सुरू करताना त्यांना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात अश्या विविध मुद्द्यांवर  त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 


यावेळी अखिल भारतीय पुणे विभागाचे व सोलापूर विद्यापीठाचे सिनेट मेंबर श्री चन्नाबसाप्पा बंकुर यांनी “स्वावलंबी भारत अभियना” विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच भविष्या मध्ये विद्यार्थ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी सहाय्य करण्याचे आश्वासन ही दिले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन त्यांनी केले. 


श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, उप प्राचार्य प्रा जे एल मुडेगावकर, कर्मयोगी पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, संशोधन अधिष्ठाता डॉ अभय उत्पात, अ.भा.वि.प. चे कार्यकर्ते सचिन पारखे, योगिनाथ बिराजदार, देसिंग भुसनर, विभागप्रमुख प्रा धनंजय शिवपुजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उदय कर्वेकर यांनी केले. आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *