👁 7 Views

दिराचे झाले वहिनीवर प्रेम, पैश्याची मागणी होताच केला तिचा गेम

 

वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे सोमवारी सायंकाळी राहत्या घरामागे असलेल्या शौचालयाच्या टाकीमध्ये एका 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.


घटनेनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या पती व सासुला ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, महिलेच्या दिरानेच तिची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबध निर्माण झाले आणि यातून महिलेकडून सतत पैश्यांची मागणी होत असल्याने तिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली आरोपी दिराने दिली आहे. माया आगलावे असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर आगलावे असे आरोपीचे नाव आहे.


वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील माया आगलावे यांच्या घरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीत त्यांच्या मृतदेह आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर आपल्या जावयाने आणि तिच्या आईनेच ही हत्या केली असल्याची माहिती माया यांच्या आईने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत, मायाच्या पतीला आणि सासूला ताब्यात घेतले होते. तसेच माया यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्या दिशेने तपास करत होते.


पोलीस माया यांच्या हत्येचा तपास करत असतानाच त्यांना खबऱ्याकडून एक माहिती मिळाली आणि पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली. दरम्यान मृत माया आणि त्यांचा चुलत दीर ज्ञानेश्वर आगलावे यांच्यात अनैतिक प्रेम संबध होते आणि त्यातूनच हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन, पोलीसा ठाण्यात आणले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *