👁 6 Views

भयानक! 5 सेकंद जरी उशीर झाला असता तर ? सत्य घटना

 

कधी कुठे जाताना वाघ आडवा आलाय का? अचानक? विचार करवत नाही ना? भयानक आहे हे…आपण आपल्याच नादात जात राहायचं आणि अचानक एखादा प्राणी आडवा येणार.


आपलं डोकं बंद पडेल. अशा वेळी प्रत्येक सेकंद आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, एक एक सेकंद “आयुष्य” असू शकतो. माणूस एखाद्या सेकंदाने सुद्धा आपला जीव वाचवू शकतो हे आपल्याला हा व्हिडीओ बघून कळतं .


उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये एक दुचाकीस्वार वाघाच्या हल्ल्यातून बचावला. सुदैवाने वाघानेही वेग दाखवला नाही आणि हे लोक थोडक्यात बचावले.

बाइकस्वाराला 5 सेकंदही उशीर झाला तर त्याचं डोकं वाघाच्या जबड्यात असायचं. दुचाकीस्वाराने कशीबशी दुचाकी मागे ढकलली आणि वाघानेही त्यांच्याकडे पाहिले आणि रस्त्यावरून जंगलाच्या दिशेने निघाला.


या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात सर्व काही रेकॉर्ड केलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *