👁 4 Views

पंढरपूर सिंहगडचा इनोव्हेशन सेल कडून विशेष गौरव

○ सलग दुसर्‍यांदा ४ स्टार रेटिंग मानांकन प्राप्त 

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या शिक्षण मंञालयामार्फत कार्यरत असणाऱ्या इनोव्हेशन सेल कडून अल्पावधीत सलग दुसऱ्यांदा ४ स्टार रेटिंग मानांकन प्राप्त केलेले जिल्ह्यातील एकमेव पंढरपूर सिंहगड महाविद्यालय असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


   केंद्रीय शिक्षण मंञालयाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, संशोधन, पेटंट निर्मिती, उद्योजकता स्टार्टअप या विषयांच्या अनुषंगाने विविध उपक्रमांची मार्गदर्शक सुचनांची यादी व उपक्रम सक्रियतेने राबविण्यासाठी विविध पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे महाविद्यालयाच्या माध्यमातून तंतोतंत पालन करण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंञालयाचे विविध उपक्रम, इनोव्हेशन कौन्सिलचे उपक्रम, महाविद्यालयाचे स्वतःचे उपक्रम युक्ती पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पतांचे, प्रकल्पांचे व उद्योगांचे परिक्षण कपिला पोर्टलच्या माध्यमातून पेटंट फाईल करण्याच्या कार्यक्रमासाठी व फाईल अनुदान, इन्क्यूबेशन सेलची निर्मिती व त्या माध्यमातून विविध उपक्रम तसेच उद्योजकता विकास सेल व त्या माध्यमांतून विशेष कार्यक्रम, विविध दिवसांचे औचित्य व स्मरण अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश या मध्ये करण्यात आला होता. 


     महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा ५५ हुन अधिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देणेसाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज नवनवीन उपक्रम नेहमीच राबवत आहे.


    महाविद्यालयाला ४ स्टार रेटिंग मानांकन प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. समीर कटेकर, डाॅ. श्रीगणेश कदम, डॉ. श्याम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, प्रा. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. नंदकिशोर फुले, प्रा. धनंजय गिराम, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. समाधान माळी, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. सोनाली घोडके, प्रा. मनोज कोळी, प्रा. राहुल घोडके, प्रा. विक्रम भाकरे, प्रा. गणेश बिराजदार, प्रा. श्याम भिमदे आदींनी परिश्रम घेतले.

    पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजने अल्पावधीतच सातत्यपूर्ण निकाल व उत्कृष्ट प्लेसमेंट मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून अल्पावधीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयास इनोव्हेशन कौन्सिल कडून सलग दुसऱ्यांदा ४ स्टार रेटिंग मानांकन मिळाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांकडून पंढरपूर सिंहगडचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *