👁 15 Views

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे गर्जे मराठी ग्लोबल अमृत महोत्सवात यश

पंढरपूर: प्रतिनिधी

गर्जे मराठी ग्लोबल आणि भागीदार संस्थांच्या व्हर्चुअल इनक्युबेशन प्रोग्राम संयुक्त पुढाकाराने इनोव्हेशन फ्रेमवर्कच्या माध्यमातून खाञीशीर” ए.एस.एस.ओ.आर.ई.डी. यश” वर आधारीत पद्मविभूषण डाॅ. रघुनाथ माशेलकर यांच्या संकल्पनेतून आणि सुञबद्धतेतुन साकारेल्या गर्जे अमृत महोत्सवात पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


   या महोत्सवामध्ये गुंतवणूकदारांना स्टार्टअप मार्गदर्शन कल्पना १८ आठवड्यांचे ट्रेनिंग असुन यामध्ये विविध महाविद्यालयातील ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामधुन ७५ स्टार्टअपची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल लेव्हल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय अनेक नामांकित मोठ्या कंपनीचे सीईओ आणि इंडस्ट्रीज एक्स्पर्ट यांच्याकडून ट्रेनिंग देण्यात येणार आहे. या ट्रेनिंग नंतर विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल च्या अनेक ग्लोबल फंडिंग तसेच गव्हमेंट संधी प्राप्त होणार आहेत. 


     एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील यशराज गवळी, दिशा व्होनमाने, धनाजी भालेराव, सार्थक नंदे, समृद्धी ताठे, श्रृती दिवटे, यश गरड, तुषार वाघमोडे या विद्यार्थ्यांची गर्जे मराठी ग्लोबल अमृत महोत्सवामधुन निवड झाली असुन हा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला

    गर्जे मराठी ग्लोबल अमृत महोत्सवातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अतुल आराध्ये अमोल निटवे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *