👁 10 Views

पोलिस भरतीचे स्वप्न राहिले अधूरे , सराव करताना तरूणाचा मृत्यू

 

नोकरीची आशा लागून असलेल्या तरुणाची नववर्षाची पहिलीच पहाट ‘काळ’ ठरली.


पोलिस भरतीसाठी पळण्याचा सराव करीत असतानाच एका तरुणाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील लोहटार येथे रविवारी पहाटे घडली.


रामचंद्र कैलास शेवरे (वय २६) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो बांधकाम कारागीर होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी व मुलगा असा परिवार आहे. पोलिस भरती जाहीर झाल्याने, रामचंद्र आणि त्याची पत्नी असे दोघेजण मैदानी चाचणीसाठी पळण्याचा सराव करीत असत. नेमकी रविवारी पत्नी त्याच्यासोबत सरावासाठी आलेली नव्हती. 


रविवारी तो मित्रासोबत पळण्याचा सराव करीत होता. त्याच्या मागावून तो पळत असताना घटना लक्षात आल्याचे कळते. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ओढवल्याचा कयास काढला जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *