👁 8 Views

पंढरपूर कॉंग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी अमर सुर्यवंशी


पंढरपूर- पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी अमर वसंत सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून एकनिष्ठपणे केलेल्या कार्याचे फळ त्यांना मिळाले आहे. यापूर्वी एन.एस.यु.आय., युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष, फादर बॉडी शहर उपाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, जिल्हा सचिव या पदावर काम केलेले आहे. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.


नुतन शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असून कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी, पक्षाचे अध्यक्ष ऍड.मल्लिकार्जुनजी खर्गे, राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री


 सुशिलकुमारजी शिंदे, आ.प्रणितीताई शिंदे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, पंढरपूरचे नेते प्रकाशतात्या पाटील, महिला नेत्या सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे कार्य करून कॉंग्रेस पक्षाची फळी मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे व येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या चिन्हावर उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी किशोर महाराज जाधव, तालुकाध्यक्ष हणमंत मोरे, अक्षय शेळके, शंकर सुरवसे, संदिप शिंदे, बाळासाहेब आसबे, शिवाजी धोत्रे, दयानंद आटकळे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *