Pandharpur : पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे

Pandharpur : पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे

Loading

पंंढरपूर तालुक्यात महसूल सप्ताहनिमित्त विविध उपक्रम

पंढरपूर, दि.(31):- महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत तालुक्यात नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने, 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असून, तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.


महसूल सप्ताहामध्ये समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये शुक्रवार 1 ऑगस्ट, 2025 रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार असून या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण तसेच मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. शनिवार दि.2 ऑगस्ट रोजी “शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात येणार आहे. रविवार दि 3 ऑगस्ट रोजी पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत.


तसेच सोमवार दि. 4 ऑगस्ट रोजी मंडळनिहाय “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. मंगळवार दि. 5 ऑगस्ट रोजी “विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. बुधवार दि. 6 ऑगस्ट रोजी “शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. गुरुवार दि. 07 रोजी कृत्रिम वाळू (एम -सँड) धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे तसेच महसूल सप्ताह सांगता समारंभ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली .


या महसुल सप्ताहात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सर्व घटकातील मान्यवर व्यक्ती तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दि 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत सहभाग नोंदवावा असे आवाहनही तहसिलदार लंगुटे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *