पंढरपूर | दि. २२ जुलै २०२५

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा ५५ वा वाढदिवस साधेपणाने आणि समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्यात आला. याच निमित्ताने भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस श्री. संदीप गिड्डे-पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ₹५,५५,५५५/- (पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये) चे भव्य योगदान दिले.
हा धनादेश पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर सभागृहात थेट मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
🟠 या वेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
मा. मंत्री जयकुमार गोरे
आमदार गोपीचंद पडळकर
आमदार समाधान आवताडे
माजी आमदार प्रशांत परिचारक
माजी खासदार रणजित निंबाळकर
भाजपा नेते मिलिंद कोरे, विजय शेजाळ
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
मुख्यमंत्री देवेंद्रजींचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिला वाढदिवस असल्याने संपूर्ण राज्यभरात जल्लोषाचे वातावरण होते. मात्र त्यांनी भावनिक आवाहन करत स्पष्ट सांगितले होते की, “हा वाढदिवस कोणत्याही फलक, हार, पुष्पगुच्छ न देता मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देवून साजरा करावा.”
या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक आमदार व पदाधिकाऱ्यांनी निधी दिला. परंतु पक्षाच्या रचनात्मक संघटनेतील पदाधिकारी म्हणून, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अहोरात्र झटणारे श्री. संदीप गिड्डे-पाटील यांनी दिलेले ₹५,५५,५५५ चे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सामान्य कार्यकर्त्याच्या असामान्य योगदानाचे मनापासून कौतुक करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली.
🔸 याच वेळी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ११,१११ गरजू विद्यार्थ्यांना ५५,५५५ वह्यांचे वाटप हा स्वतंत्र उपक्रम संदीप गिड्डे-पाटील यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री महोदयांनी या उपक्रमालाही कौतुकाची थाप दिली.